Top News

हेरले गावात प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत



संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख मा. बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथून सांगलीकडे रवाना होताना हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम व नाभिक समाजाच्या वतीने तसेच जेष्ठ नागरिक, बौद्ध समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे,ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी थांबली पाहिजे आणि एस.सी, एस,टी घटकाला शासकीय नोकरीत पदोन्नती मिळाली पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन ही यात्रा मुंबई येथून निघाली आहे. याचा समारोप औरंगाबाद येथे होणार आहे या यात्रेला हातकणंगले तालुक्यातील सर्व ओबीसी घटकांचा,एस.सी,एस.टी घटकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला हातकणंगले येथे कॉर्नर सभा घेऊन ही यात्रा सांगलीकडे रवाना झाली.

 या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष आशपाक देसाई उद्योजक सरदार आवळे ,माजी उपसरपंच बख्तियार जमादार,मुनीर जमादार, माजी सरपंच रियाज जमादार, सुरेश कदम, ज्येष्ठ नागरिक अशोक कदम, सुकुमार खाबडे, बबन शिंदे, नाभिक समाज व वंचित चे अध्यक्ष दादासो काशीद,मुस्लिम समाज माजी अध्यक्ष अल्लाउद्दीन खतीब, युवराज काशीद, तानाजी काशीद,अभिजीत काशीद,चंद्रकांत काशिद, डेविड लोखंडे,अमोल धुळे,राहुल धुळे गौतम कोले, संदीप कोले,संताजी खाबडे,बटूवेल कदम, निखिल कोले, सतीश कुरणे,संजय शिंदे, प्रशांत खाबडे, सचिन कोले, रियाज जमादार (जाकी),इमाम जमादार,सलीम मुल्ला, राजू मुल्ला,रफिक तांबोळी यांच्यासह गौतम ज्येष्ठ नागरिक संघटना,नाभिक संघटना ,ओबीसी मुस्लिम संघटना व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

थोडे नवीन जरा जुने