मजरेवाडी...बाळुमामा मंदिरमार्गे व्हाया - अकिवाट हा पर्याय उपलब्ध
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील कृष्णा -पंचगंगेच्या पाणी पातळीत काल दिवसभरात संथ गतीने वाढ होत आहे. यामुळे आज पहाटे मजरेवाडी-अकिवाट रस्त्यावरील भोरे पेट्रोल पंपाजवळ पुराचे पाणी आले आहे. सद्या रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी आहे. तरीही पाण्यातुनच दुचाकी... चारचाकी वाहनाची वाहतुक सुरु आहे. दरम्यान मजरेवाडी ते बाळुमामा मंदिर मार्गे गुरुदत्त कारखान्यावरुन अकिवाट ला जाण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.
