Top News

शिरोळ नदी रस्त्यावरील काटेरी झुडपामुळे वाहतुकीस अडथळा



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

      येथील पंचगंगा नदीवरून जाणाऱ्या शिरोळ ते कुरुंदवाड जुन्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत या झुडपांच्या फांद्या रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन पास करताना वाहन चालकांना या झुडपांचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे रस्त्यावर आलेल्या झुडपांच्या फांद्या तात्काळ काढून घ्याव्यात अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

शिरोळ कुरुंदवाड जुन्या रस्त्यावरील दसरा चौक ते पंचगंगा नदी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत या मोठ्या झुडप्याच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत यामुळे निम्मा रस्ताच वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे तसेच दुचाकीवरून ये जा  करणाऱ्या नागरिकांना या काटेरी झुडपांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच पंचगंगा नदीवर अंत्यसंस्कार विधी व रक्षा विसर्जनासाठी दररोज नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते तसेच शेताकडे जाणाऱ्या शेतकरी बांधवांना ही सुद्धा दररोज या रस्त्यावरून ये जा करावी लागते त्याचबरोबर कुरुंदवाडकडे जाणारे आणि शिरोळकडे येणारे वाहनधारकांची संख्या मोठी आहे त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा रस्ता आहे रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी झुडपांमुळे निम्म्या रस्त्यावरूनच वाहतूक करावी लागत आहे यामुळे एकमेक वाहन पास करत असताना चालकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच काटेरी झुडपे लागून दुचाकीस्वार जखमी होत आहे यामुळे काटेरी झुडपांच्या रस्त्यावर आलेल्या फांद्या काढून घेणे गरजेचे आहे पण याकडे शिरोळ नगरपरिषद प्रशासन आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे यामुळे या दोन्ही विभागाबाबत जनतेतून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी झुडपांच्या वाढलेल्या फांद्या त्वरित काढून घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुलभ करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने