Top News

हनुमान जन्मोत्सव यात्रा महोत्सव निमित्ताने नवे दानवाड येथे भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान संपन्न

 प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

बाळासाहेब ग्रामीण पतसंस्था, नवे दानवाड यांच्या वतीने पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री. मंतेश बाळासाहेब गारगोटे यांच्याकडून नवे दानवाड ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव सोहळा (यात्रेच्या)  निमित्ताने रविवार दि. २८-०४-२०२४ रोजी सायंकाळी ५ वा. कुमार विद्या मंदिर, नवे दानवाड या शाळेच्या मैदानामध्ये भास्करराव पेरे-पाटील माजी सरपंच, महाराष्ट्र राज्य आदर्श गाव- पाटोदा , जिल्हा- औरंगाबाद यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले व यात्रेची सांगता करण्यात आली, स्वागत प्रमोद परिट सर यांनी केले, आभार अनिल आंबुपे यांनी मानले, यावेळी लोक नियुक्त सरपंच डॉ सी डी पाटील यांनी पेर पाटलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर मंतेश गारगोटे यांचा सत्कार पेरे पाटील यांनी केले व संजय धनगर यांनी डॉ सी डी पाटील यांचा सत्कार केला, यावेळी उपस्थित रावसो कुंभोजे,नाना अंबुपे, प्रकाश तिप्पनावर,ॲड राहुलराज कांबळे, पिंटू माळी, विरू धनगर, सचिन आंबुपे, सज्जन सिंग रजपूत,सुर्यकांत बेरड, श्रावण कांबळे, शिवानंद माळी, शिवाजी साळुंखे, सुकुमार धनगर,पूनम साळुंखे, निर्मला चौगुले, सरिता जाधव, पोलिस पाटील डॉ स्वाती कुन्नुरे, सारिका परीट, दिपाली कांबळे, मालती निर्मळे, रोहिदास निर्मळे,मिलिंद गारगोटे, सद्दाम सनदी, युनुस कूरणे,शिवराज बेरड, उपसरपंच प्रशांत कांबळे, दानवाड-दत्तवाड परिसरातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व नेतेमंडळी,व सर्व प्रतिष्ठीत नागरिक, सर्व व्यापारी, सर्व सोसायटी, पतसंस्था,व दूध संस्थांचे पदाधिकारी व सभासद, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने