Top News

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षणास प्रारंभ

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ (आगरभाग) शिरोळ, संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजेआगरच्या वतीने दुसऱ्या वर्षीही 10 दिवशीय लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण कांबर्डे वसाहतीच्या मैदानावर सुरू झाले आहे. 

सदर लेदर बॉल क्रिकेट शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव मेजर के. एम. भोसले  संचालक अमित जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक  खंडेराव जगदाळे  क्रीडाशिक्षक व लेदर बॉल क्रिकेटचे  प्रशिक्षक पृथ्वीचंद माछरेकर  विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि क्रिकेटपट्टू  सोहेल गवंडी यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते. मेजर के एम भोसले यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

थोडे नवीन जरा जुने