Top News

हेरवाडच्या सरपंच सौ. रेखा जाधव यांच्याकडून शिरटीच्या श्री भैरेश्वरास समई अर्पण

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरटी (ता शिरोळ) येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त हेरवाडच्या लोकनियुक्त सरपंच आणि शिरटीच्या माहेरवाशीन सौ. रेखा जाधव यांनी श्री भैरेश्वरास समई अर्पण करून ग्रामदैवताचे दर्शन घेतले.

बुधवारपासून श्री भैरेश्वर मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळा सुरू झाला आहे यानिमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रम तीन दिवस होत आहे या धार्मिक सोहळ्यासाठी अनेक ठिकाणी सासरी गेलेल्या शिरटी येथील लेकी मोठ्या संख्येने माहेरात आल्या आहेत या माहेरवाशिन लेकी विविध स्वरूपात या धार्मिक सोहळ्यासाठी मदत करीत आहेत त्याच पद्धतीने हेरवाडच्या लोकनियुक्त सरपंच सौ रेखा जाधव याही या कार्यक्रमासाठी आपल्या माहेरी शिरटी येथे आल्या आहेत.

सौ रेखा जाधव यांनी श्री भैरवेश्वराच्या मंदिरात येऊन दोन समई अर्पण करून मनोभावे श्री भैरेश्वराची प्रार्थना केली यावेळी त्यांनी मंदिराचे पुजारी गुरव यांच्याकडे त्या समई दिल्या यावेळी शिरटीचे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी माजी उपसरपंच पुंडलिक भंडारे यांच्यासह श्री भैरेश्वर मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण वास्तुशांती सोहळा समिती श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने