Top News

कर्नाटकातील चिकोडी लोकसभेसाठी एकूण २० उमेदवारांकडून २७ अर्ज दाखल

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        देशातील 18 व्या लोक सभेसाठी निवडणुका होत आहेत, चिकोडी लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली असून, मागील १२ एप्रिल पासून १९ एप्रिलपर्यंत २० उमेदवारानी एकूण २७ उमेदवारी अर्ज भरले आहेत.

       चिकोडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी ३ अर्ज, काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी ४ उमेदवारी अर्ज, अखिल भारत हिंदू महासभा पक्षाचे काडया शंकरया हिरेमठ - १ अर्ज, कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाकडून कुमार डोंगरे १, सर्व जनता पार्टी पक्षाकडून आप्पासाहेब कुरणे-२, बहुजन भारत पार्टीकडून पवनकुमार बाबुराव माळगे-१, भारतीय जवान किसान पार्टीकडून सत्यप्पा दशरथ काळेली-१, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून जितेंद्र सुभाष नेर्ली-१, काशिनाथ कुरणी-१, महेश अशोक १, गजानन पुजारी-२, भीमसेन सनदी-१, सम्मेद सरदार वर्धमाने-१, विलास मन्नुर-१, शंभू कल्लोळकर २, मोहन मोटनवर १, मगदूम इस्माईल १, श्रेणीक आप्पासाहेब जंगटे १, यासिन सिराजूद्दीन पटकी १ आदींनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. दि .२० रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. तर दि. २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे असे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले आहे.

थोडे नवीन जरा जुने