शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची बदली झाल्याने या रिक्त पदासाठी कार्यालयाचा पदभार नूतन गटविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा दिलीप बागल यांनी स्वीकारला आहे . यावेळी पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी भारती सुनील कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
दरम्यान नूतन गटविकास अधिकारी बागल म्हणाल्या, शिरोळ तालुक्यात काम करताना आनंद वाटतो. या भागातील जनता अतिशय चांगली असून पंचायत समितीचे कामकाज पाहताना सर्वांचे सहकार्य मिळावे, यावेळी शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक इरफान पटेल,कनिष्ठ सहाय्यक जगदिश कांबळे,वैशाली लाटकर,प्रियांका कोळेकर यांच्यासह विस्तार अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
