दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्ट,सद्गुरु अल्लमप्रभू योगपीठ अल्लमगिरी आळते यांच्या वतीने आयोजित १९ वा गणमेळाव्यात जगदगुरू बसवकुमार स्वामीजी व माता डॉक्टर गंगादेवी माताजी यांच्या अधिपत्याखाली झालेल्या सोहळ्यात हेरवाड येथील तालुका प्रसिद्धीप्रमुख व विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड चे मुख्याध्यापक दिलीप गणपती शिरढोणे यांना यंदाचा "बसवभूषण आदर्श पत्रकार" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्तवाड परिसरात त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
स्वर्गीय बंडा आप्पा माने ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंडू पाटील, पावडोबा विकास संस्थेचे माजी चेअरमन पांडुरंग बाबू चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संभाजी मोहिते,उद्योगपती अशोक पाटील,अमित माने,प्रमोद पाटील,नामदेव चव्हाण,जगन्नाथ चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दत्तवाड पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष संजय सुतार,मिलिंद देशपांडे,इसाक नदाफ यांच्या वतीने ही सत्कार करण्यात आला.
