Top News

इचलकरंजीत गुरुवारी सत्यजित पाटील-सरुडकर यांचा प्रचार मेळावा



  इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

 हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ येथील तांबे माळ मधील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 11 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता होणार्‍या या मेळाव्यास इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरीकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनी केले. ते शहर काँग्रेस कमिटीत झालेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलत होते.

         हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्ष जोमाने त्यांचा प्रचार करत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातही त्यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी आज शहर काँग्रेस कमिटीत घटक पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी मदन कारंडे, शशांक बावचकर, प्रताप होगाडे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, प्रकाश मोरबाळे, संजय तेलनाडे, भाई शिवाजी साळुंखे, सदा मलाबादे यांनी सत्यजित पाटील हे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना समाजातील प्रश्‍नाची जाण आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर मतदारांनी त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय. आता आपण जनतेपर्यंत पोहचून सत्यजित पाटील यांचे कार्य आणि आजी-माजी खासदारांची निष्क्रीयता पोहचवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रचाराचा पहिला मेळावा घेऊन सत्यजित पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार यावेळी सर्वच प्रमुखांनी केला. सागर चाळके यांनी 11 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता तांबे माळ मधील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन मध्ये मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच या मेळाव्यात विधानपरिषदेचे गट नेते-आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष-आमदार जयंत पाटील, शिवसेना उबाठा गटाचे सह संपर्क प्रमुख संजय पवार हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

     या बैठकीस संभाजी नाईक, राहुल खंजिरे, उदयसिंग पाटील, चंद्रकांत शेळके, महेश बोहरा, प्रमोद खुडे, अभिजीत रवंदे, भूषण माने, युवराज शिंगाडे, संभाजी सुर्यवंशी, रविराज पाटील, सुशांत कोटगी, बिस्मिल्ला गैबान, सुष्मा भिसे,  यांच्यासह इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने