अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सीमाभागातील विद्यानगरि म्हणून प्रचलित असलेल्या कारदगा ता.निपाणी येथे रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी ६ वे कन्नड साहित्य संमेलन जेष्ठ साहित्यिक सरजू काटकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार असल्याची माहिती कारदगा ग्राम पंचायत माजी अध्यक्ष,विद्यमान सदस्य तसेच आयोजन कमिटीचे गौरवाध्यक्ष राजू खिचडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी सेक्रेटरी माणिक चंडगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संमेलनाबद्दल माहिती दिली.यावेळी राजू खिचडे पुढे म्हणाले की हे समेलन सकाळी ग्रंथ दिंडीने सुरू होणार असून ध्वजारोहण ढोणेवाडी ग्राम पंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते तर प्रतिमा पूजन कारदगा ग्राम पंचायत उपाध्यक्ष निवधुत धनगर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दिंडी संमेलन स्थळी आल्यानंतर सकाळी १०.३० वाजता प.पू 108 आचार्य.कुलरत्न भूषण मुनिमहराज,प.पू. संपादना महास्वामी,प.पू.दरिखान अजन्नवर,प.पू. साधनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी माजी खासदार राजू शेट्टी व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.संमेलनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन आमदार शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते तर प.पू. आल्लम प्रभू महास्वामी जीवनावर पुस्तक प्रकाशन आमदार गणेश हुक्केरी व आमदार चन्नराज हट्टीहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी अल्लमप्रभू सभामंडपाचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते व व्यासपीठ उदघाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य आण्णासाहेब हवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा सुजाता वडर या उपस्थित राहणार आहेत.या उदघाटन सत्रासाठी राजकीय,सामाजिक,साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता विचार गोष्टी सदरात डॉ. होंबय होंनेलगेरे व डॉ.एन.एस.मादांनावर निपाणी व डी.बी.कुंभार हे विचार व्यक्त करणार आहेत.दुपारी २.३० वाजता हजरत अली देगीनाळ यांच्या अध्यक्षतेखाली अनेक नामवंत कवींचे कविसंमेलन होणार आहे.सायंकाळी ५ वाजता संपादना महास्वामीजिंच्या दिव्य सानिध्यात जेष्ठ साहित्यिक सरजु काटकर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप करण्यात येणार आहे.सायंकाळी ६ वाजता मराठी,कन्नड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व रामचंद्र काकडे व सुभाष संकपाळ यांचा हास्य विनोद कार्यक्रम होणार आहे.तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे शेवटी राजू खिचडे यांनी सांगितले.यावेळी शकुंतला कमते यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्ष संजय गावडे,सुभाष ठकाने ,ग्राम पंचायत अध्यक्षा सुजाता वडर,उपाध्यक्षा मंगल डांगे,पी.आर.नरवाडे,अभिजित देसाई,महावीर पाटील,किरण सदलगे,निता बागे,रसिदा पटेल,स्वाती कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
