Top News

जिनवाणी अर्बन सोसायटीच्या वतीने जानेवारी १३ ते १५ अखेर विविध कार्यक्रम : अध्यक्षा सुनिता हवले यांची माहिती



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव ता.निपाणी येथील जिनवाणी अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने खास मकर संक्रांती निमित्त शनिवार दि.१३ ते सोमवार दि.१५ जानेवारी अखेर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा महोत्सव,तिळगुळ वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिनवाणी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा सुनिता आण्णासाहेब हवले यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली.

      पुढे माहिती देताना सुनिता हवले म्हणाल्या की बोरगाव व परिसरातील महिलांना बचतीची सवय लागून त्यांचा आर्थिक विकास व्हावा या ध्येयाने जिनवाणी अर्बन सोसायटीची स्थापना माजी मंत्री प्रकाश हुक्केरी व माजी जिल्हा पंचायत सदस्य आण्णासाहेब हवले यांच्या प्रेरणेने करण्यात आली.व २००३ पासून महिलांना आर्थिक व्यवहाराबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मकर संक्रात सणाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यास सुरुवात केली.याला आज २० वर्षे पूर्ण होत असून चालू वर्षी स्मार्ट सौभाग्यवती होम मिनिस्टर,हिंदी अंताक्षरी,रांगोळी व संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

     प्रारंभी दि.१३ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत स्मार्ट सौभाग्यवती होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येणार असून यासाठी प्रथम क्रमांक ११००० रू.ची पैठणी,द्वितीय क्रमांक सोन्याची कर्णफुले,तृतीय क्रमांक सोन्याची नथ,चतुर्थ क्रमांक चांदीचा करंडा व पाचव्या क्रमांकास मंगल कलश अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दि.१४ रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत हिंदी अंताक्षरी,स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर रांगोळी तसेच संगीत खुर्ची अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत.तर दि.१५ रोजी दुपारी १२ ते ५ पर्यंत मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप,सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.हे सर्व कार्यक्रम श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संपन्न होणार आहेत.तरी या स्पर्धेत महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे शेवटी सांगितले.

     यावेळी उपाध्यक्षा रोहिणी बसन्नावर,अलका पाटील,पदमश्री तेरदाळे, सुनिता दा. हवले,माणिक फिरगन्नावर,लता पाटील,हलिमा मुजावर,सविता म्हैशाळे,सुनंदा हवले,लक्ष्मीबाई शिंगे,जयश्री पाटील,मनेंजर रेखा कुन्नुरे आदी उपस्थित होत्या.


थोडे नवीन जरा जुने