हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये अनेक मराठा बांधव जखमी झाले असून याचे निषेधार्थ समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला असून शिरोळ तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने सोमवारी शिरोळ तालुका बंदचे वाहन करण्यात आले असून या आंदोलनाला हेरवाड येथील राजश्री शाहू विकास आघाडीचा पाठिंबा राहील व सोमवारच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रमुख माजी सरपंच सुरगोंडा पाटील यांनी दिली.
मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा तरुण, महिला, वृद्ध, लहान मुले असे हजारोंच्या संख्येने अंतरावली सराटी या गावी मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले असताना आज दि. १ सप्टेंबर रोजी अचानक पोलिसांचा मोठा ताफा तिथे पूर्ण तयारीने आला आणि त्यांनी अचानक हल्ला चढविला.
५४ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने शांततेत काढून जगभरात नाव केले . पण या लाठीचार्जमुळें शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळण्याचे प्रयत्न केल्या गेले. लाठी चार्ज मध्ये अनेक मराठा बांधव जखमी झाले असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिरोळ तालुका बंदचे आवाहन करण्यात आले असून या बंदमध्ये राजश्री शाहू विकास आघाडी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचेही पाटील यावेळी बोलताना सांगितले.

