अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न फिटल्याने मानसिक तणावातून सेंट्रींग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. स्वप्निल मनोहर सुतार वय - ३३ रा. जत्राट वेस मातंग वसाहत असे आत्महत्या मृताचें नाव आहे.
याबाबत पोलिस. स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी की, स्वप्निल हा गेल्या अनेक वर्षापासून सेंट्रींग कामगार म्हणून काम करतो. त्याने बचत गटाकडून घरगुती कामासाठी कर्ज घेतले होते. मात्र बचत गटाचे कर्ज फेडणे अशक्य झाल्यामुळे घरात कुटुंबीयांसोबत घेतलेल्या कर्जावरून सातत्याने वाद निर्माण होत होते. तसेच आठ दिवस तो आपल्या पत्नीसह सासरवाडीला राहण्यासाठी गेला होता. रविवारी सायंकाळी तो आपल्या घरी परतला होता. मात्र घरात कोणीच नसल्याचे पाहून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मृत स्वप्निल यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ असा परिवार आहे.
दोन दिवसांपूर्वीच या परिसरात केशव शिंदे राहणार जत्राट वेस या युवकांनी आत्महत्या केली होती .एका आठवड्यात दोन युवकांच्या आत्महत्या झाल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेसाठी अधिक तपास निपाणी येथील बस्वेश्वर चौक पोलीस स्टेशन करित आहे.
