हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
काल रात्री शिरोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे रात्री च्या सुमारास आलगोंडा पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. दरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
शिरोळ तालुक्यात रात्री १२ वाजल्यापासून सुमारे २ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान हेरवाड येथीलसुमारास आलगोंडा पाटील यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
