Top News

हेरवाड-घोसरवाड मार्ग पाण्याखाली

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोसल्याने हेरवाड - घोसरवाड हा मार्ग पाण्याखाली गेला. दरम्यान पावसामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

हेरवाड येथे गुरुवारी सायंकाळपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. सुमारे १० ते १२ तास धो - धो पाऊस पडल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकरीवर्गाने कष्टाने पिकवलेल्या सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

या पावसामुळे हेरवाड - घोसरवाड मार्गावर सुमारे तीन फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

थोडे नवीन जरा जुने