Top News

हेरवाडला १५ लाखाचा निधी : नामदार डॉ.विश्वजित कदम

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी 15 लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी कोल्हापूर येथे केली.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दि.18 एप्रिल ते 22 मे 2022 दरम्यान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी विधवा प्रथा बंदचा ठराव करून त्यांची अंमल बजावणी केल्याबद्दल सरपंच सुरगोंडा पाटील व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने