Top News

हेरवाडमधील हायमास्टची बत्ती गुल्ल ... !

 ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ; हायमास्ट दिवे बंद

संग्रहित

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड : जिल्हा परिषदेच्या सदस्य स्वाती सासणे यांच्या फंडातून माळ भाग व एकता चौक येथे मंजूर झालेल्या हायमास्टची बत्ती गुल्ल झाली आहे. गेली तीन ते चार महिने या हायमास्टवरील पथदिवे बंद असल्याने याकडे मात्र संबंधित ठेकेदाराने दुर्लक्षच केले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती सासणे यांनी हायमास्टसाठी खर्च केलेला फंड वाया जात असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.

तसेच संबंधित ठेकेदाराला ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार सूचना देऊन सुद्धा या हायमास्टची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सुचनेला संबंधित ठेकेदाराने केराची टोपली दाखवली आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे या हायमास्ट दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती सासणे लक्ष घालणार का ? याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

थोडे नवीन जरा जुने