हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
हेरवाड सह परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात महावितरण विभागाचे तीन ते चार पोल जमिनदोस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणची टीम हेरवामध्ये दाखल झाली असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गांवभागात सायंकाळी तर माळभागात आज दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
हेरवाडसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने हाहाकार माजविला असून तिन ते चार विजेचे पोल, अनेक झाडे तसेच ग्रामपंचायत सदस्य शिरढोणे यांचा बेकरी वजा खोका वादळी वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी पावसात एक महिला जखमी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ : ३० वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की या वार्यामध्ये गावातील शिरढोणे घर व एकता चौकातील सुमारे १०० वर्षाहून अधिक जुने असलेले वडाचे झाड विजेच्या खांबावर कोसळल्यामुळे स्टॅन्ड चौक, शेळके कोपरा यासह काही भागातील विजेचे पोल जमिनदोस्त झाले. विजेचे पोल कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरणची टीम हेरवामध्ये दाखल झाली असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गांवभागात सायंकाळी तर माळभागात आज दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
