शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
चिपरी (ता शिरोळ) येथील राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे केंद्र समन्वयक व मुख्याध्यापक अनिल दिनकर खिलारे यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते श्री खिलारे यांना कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आदर्श शिक्षक अनिल खिलारे यांनी अध्यापक के मुख्याध्यापक असा शैक्षणिक प्रवास केला असून 28 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम ते कार्यरत आहेत. शैक्षणिक धोरणानुसार कर्तव्यनिष्ठ काम करण्यात त्यांची कसोटी आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट काम केले असून शाळा व समाज यांच्यात जवळीकता निर्माण करून शैक्षणिक वातावरण निर्मिती केली केली आहे, शैक्षणिक उठाव अंतर्गत शाळा व शाळेचा परिसर सुशोभीकरण तसेच जे पी नाईक शाळा समृद्धी उपक्रमांतर्गत राजर्षी शाहू विद्या मंदिर चिपरी या शाळेचे नामकरण यासह विद्यार्थी-पालक यांच्यात सुसंवाद, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर, पटसंख्या वाढीबरोबरच मुलांच्या गुणात्मक कौशल्य विकासासाठी श्री खिलारे यांनी मोठे योगदान आहे, विशेष उल्लेखनीय गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकरत्न अनिल खिलारे यांना जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला.
या समारंभास आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील - यड्रावकर , आमदार जयंत आसगावकर , मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत शिंपी, शिक्षण व अर्थ समितीच्या रसिका पाटील, शिक्षण अधिकारी आशा उबाळे, शिरोळ गटशिक्षणाधिकारी दिपक कामत यांच्यासह महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती शुभांगी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य वंदना जाधव,प्रसाद खोबरे,अनिल इंगवले ,अर्जुन आबिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
