शिवार न्यूज नेटवर्क :
स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज 'पावनखिंड' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'पावनखिंड' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आज बहुप्रतिक्षित 'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.
सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागल्याने अनेक सिनेप्रेमींना आज सिनेमा पाहता आला नाही. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.