Top News

रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीचे संचालक विलास माने यांचे निधन

 


हेरवाड : 

रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणी, तमदलगे तसेच संभाजी माने सेवा सोसायटी, हेरवाडचे संचालक विलास बापू माने (वय ६५) यांचे रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने हेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. विलास माने यांनी सामाजिक, सहकार आणि संस्थात्मक क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. शांत, मनमिळावू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. कै. विलास बापू माने यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

थोडे नवीन जरा जुने