Top News

ढोणेवाडीत 16 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप

पत्रकार प्रशांत कांबळे यांच्या विशेष प्रयत्नांना यश; महिलांना मिळाला धूरमुक्त स्वयंपाकाचा आधार

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथे 16 पात्र लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे.

आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य सरोजिनी कांबळे यांच्या प्रयत्नातून तसेच पत्रकार प्रशांत कांबळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे 16 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर व गॅस शेगड्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना सरोजिनी कांबळे म्हणाल्या, "केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोल्ले आण्णा-वहिनी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिवाजी खोत यांनी केले. यावेळी सखाराम नागराळे, कऱ्याप्पा गावडे, सतीश कळवे, पिंटू जमादार, वैभव कांबळे, प्रशांत कांबळे यांच्यासह ग्रामस्थ, महिला लाभार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे ढोणेवाडी परिसरात स्वागत होत असून लाभार्थींनी केंद्र शासन व आयोजकांचे आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने