Top News

सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.... स्व. सत्यापाण्णा बरगाले यांचा आज द्वितीय स्मृतिदिन ...

 


कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, शिरोळ तालुक्यातील सहकारातील जाणते नेतृत्व, सामान्यांचे असामान्य नेतृत्त्व लोकनेते माननीय श्री सत्त्याप्पाण्णा बरगाले यांचा आज व्दितीय स्मृतीदिन...

     शिरोळच्या रांगड्या भूमीत बालपण गेलेले बाल शिवाजी मंडळाच्या माध्यमातून कबड्डी खेळातून आपले करिअर घडविले त्यानंतर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य पदासपासून सुरुवात झालेली राजकीय कारकीर्द ते थेट सरपंच, सेवा संस्थांचे चेअरमन, शिरोळ तालुका देखरेख संघ, चेअरमन मार्केट कमिटी, पंचगंगा सहकारी साखर कारखाना संचालक, तालुका दूध संघाचे चेअरमन ते गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद या माध्यमातून सर्वसामान्य दिनदलित, दुबळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, त्यांची स्वतःची काम करण्याची एक बेगळी पद्धत होती. 

     त्यांना स्वतःला कधी खोटेपणा आवडत नसायचा ते कधी कोणाचेही खोटी स्तुती करत नसत की खोटी स्तुती करण्यापेक्षा जे खरं आणि खोटं असेल ते त्या व्यक्तीच्या समोरच बोलायचे, त्यामध्ये ते कोणाचीही भिड ठेवायचे नाही. आपल्या रोखठोक सभावामुळे त्यांना कितीतरी वेळा राजकीय नुकसान त्यांना सोसावे लागले परंतु ते त्यापासून डगमगले नाहीत. ते योग्य व्यक्तीच्या मागे ठामपणे उभे राहायचे. त्यांच्या या स्वभावामुळे ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना हेरवाड गावाला पहिली तंटामुक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सन्माननीय उपजिल्हा पोलीस यांच्या हस्ते गावात अतिशय मोठा सन्मान केला. 

पन्नास वर्षाच्या त्यांच्या राजकीय सहकार क्षेत्रात कार्य करून भ्रष्टाचाराचा एक नख देखील त्यांच्या अंगाला स्पर्श झाला नाही. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांचे गुरु देशभक्त रत्नापाण्णा कुं भार यांच्याबरोबरच खासदार बाळासाहेब माने, सहकार महर्षी सारे पाटील सन्माननीय, शामराव पाटील महादेवरावजी महाडिक, अरुणरावजी नरके यांच्यावर अतिशय त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. संपूर्ण आयुष्य चंदनाप्रमाणे झिजून दुसऱ्याचे आयुष्य फुलवत राहिले.. म्हणूनच संपूर्ण शिरोळ तालुका त्यांना आदराने सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून संबोधित असे. 

अशा या लोकनेत्याची आठवण हेरवाडकर ग्रामस्थ, तालुक्यातील जनतेच्या मनात नेहमी तेवत राहील, अशा या लोकनेत्याला त्यांच्या व्दितीय स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ..

            - शब्दांकन : संतोष तारळे


थोडे नवीन जरा जुने