हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
कन्या विद्या मंदिर शिरढोण शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम श्री बिरोबा मंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्नेहसंमेलन पार्श्व भूमीवर घेण्यात आलेल्या महिला पालकांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाबासो हेरवाडे होते.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतीमा पुजन व दिप प्रज्वलन सरपंच बाबासो हेरवाडे व टेजचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य शक्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामस्थ व पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला चिमुकल्यांच्या विविध नृत्य आविष्काराने प्रेक्षक भारावून गेले अनेकांनी बक्षिसांचा वर्षाव केला आणि कौतुक केलं.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बंडगर सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.तेजस्वीनी पाटील, उपाध्यक्ष सौ. वृशाली बालीघाटे, माजी अध्यक्ष बाबासो मालगावे, याच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,सदस्या, सर्व शिक्षक शिक्षिका डान्स टिचर यांनी विशेष परिश्रम घेतले.कन्या शाळेतील शिक्षिका सौ.रिहाना कोठावळे यांना जिल्हास्तरीय गुरुदेव पुरस्कार मिळाल्यामुळे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विशेष सहकार्य श्री गणेश मंडप शिरढोण, कुंभार सांऊड अ.लाट,डी.एस.पी.लाईट इचलकरंजी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री महेश घोटणे संरानी भारदस्त आवाजाने कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमासाठी उपसरपंच रेश्मा चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे,रवी कांबळे, संभाजी कोळी,सदस्या ललिता जाधव, अनिता मोरडे,मालन कुंभार, संगिता मगदुम पोलिस पाटील अनुराधा जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद कांबळे,
सचिन जाधव, शहाबुद्दीन टाकवडे, डॉ.कुमार पाटील,राजु मुजावर, प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
