Top News

पुतळा समितीचे अध्यक्षपदी रावसाहेब देसाई, उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव

 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

एतिहासिक शिरोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी सोमवार दि.१५ रोजी झालेल्या सर्व समावेशक बैठकीत सर्वानुमते एकमताने हात वर करून जय भवानी, जय शिवानी अशा घोषणा देत हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष देसाई यांनी तरुणांनी उठवलेल्या आवाजाला साद घालत युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत असलेचे जाहीर केले. 

     पुतळा समिती अध्यक्ष व ट्रस्ट अध्यक्ष निवडीनंतर श्रीमती पद्मजा घारगे देसाई यांचे चिरंजीव जन्मजेराजे शाहू घारगे देसाई यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासाठी ०५ लाख रुपयांची तर स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या कुटुंबियातर्फे नातू राहुल यादव यांनी ०१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.दलितमित्र अशोकराव माने यांनी पुतळा उभारणीसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. देणगीदारांनी पुतळा उभारणीसाठी नोंदवलेल्या व जाहीर केलेल्या देणगीच्या अनुषंगाने समिती अध्यक्ष व तरुणांनी आभार मानले.

     शिरोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा या मागणीची गेली नऊ महीने तग धरून होती.समिती व ट्रस्ट अध्यक्षपदासाठी सोमवार दि.१५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे सर्व पक्षीय तरुण कार्यकर्त्यांची बैठक पार पडली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब देसाई होते.

       दरम्यान, रावसाहेब देसाई म्हणाले पुतळा समिती अध्यक्ष व ट्रस्ट समितीची निवड ही सर्व गावाची निवड आहे, सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक समिती निर्माण केली जाणार आहे, तरुणांनी राजकारण, राजकारणाच्या ठिकाणी आणि पुतळा समिती,पुतळा समितीच्या ठिकाणी ठेऊन कामकाज करावे. शिरोळच्या तरुणांनी पुतळा समिती संदर्भात दाखवलेली एकजूट, एकी महत्वाची असून ती पुतळ्याच्या उभारणी नंतर सुद्धा कायम ठेवावी, असे आवाहन केले.

       प्रारंभी शक्तीजित गुरव यांनी मागील बैठकीचा आढावा घेत सर्वानुमते घेतलेला निर्णय सर्व पक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांना मान्य असेल असे स्पष्ट केले, त्यानंर दत्तचे संचालक दरगू गावडे, वाहतूक संघटनेचे धनाजी पाटील नरदेकर , बंटी तथा यशवंत देसाई, राहुल यादव , पृथ्वीराज यादव, पंडित काळे, धनाजी चूडमुंगे, राकेश जगदाळे, बजरंग काळे गुरुजी यांनी समिती व ट्रस्ट अध्यक्षपदासाठी मनोगतातून मत व्यक्त केले, त्या नंतर एकमताने अध्यक्ष पदी रावसाहेब देसाई ,उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष काळे गुरुजी यांनी देसाई यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच दत्तचे संचालक दरगू गावडे यांनी जन्मजेराजे देसाई यांचा सत्कार करून संपूर्ण शिरोळवासीयांच्या वतीने आभार मानण्यात आले. बैठकीला शहरातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते. आभार स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने