Top News

बेडकिहाळमध्ये उद्या ऊस उत्पादकांचा मेळावा

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

    चिकोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी वाहतूकदार संघटना व हसिरू क्रांती संघटना यांच्या सहकार्याने नियोजनार्थ चिकोडी, निपाणी भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा उद्या गुरुवार दि. ५ रोजी बेडकिहाळ येथील बी. एस. संयुक्त पदवीपूर्व कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांची उपस्थिती असणार याची माहिती शेतकरी संघटनेचे चिकोडी जिल्हा कार्याध्यक्ष तात्यासाहेब केस्ते यांनी दिली. ते पुढे म्हणाले, उसाला मागील गळीत हंगामाचे ४०० रुपये फरक बिल मिळाले पाहिजे, उसाला दर दिल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, अशा मागण्या करण्यात येणार आहे. तालुकाध्यक्ष सुभाष चौगुले सह संघटनेचे कार्यकर्ते राजू खिचडे, प्रवीण शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश पाटील, पंकज तिप्पन्नावर, तात्यासाहेब गव बसन्नावर, राकेश पाटील, रमेश मालगावे, विकास समगे, उदय चौगुले, संतोष माने, रमेश मगदूम, प्रशांत पाटील- कोनाप, सुरज पडलिहाळे, शीतल पाटील, बाहुबली पाटील, अशोक पाटील डमडरे, अभय पाटील, संतोष पाटील, युवराज आदी उपस्थित राहणार आहेत.तरी ऊस उत्पादक शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.               

थोडे नवीन जरा जुने