Top News

पिग्मी एजंट चा मुलगा बनला पोलीस

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

विज्ञान विभागात उच्चशिक्षित होऊन ही पोलिस बनण्याचे स्वप्न असल्याने गेल्या दोन वर्षापासून जिद्द, चिकाटी, व कष्टाने अभ्यास करीत परिश्रम घेतल्याने आज पिग्मी एजंट चा मुलगा पोलीस बनला आहे. बोरगाव येथील युवक कु. शुभम बाहुबली रोड्ड यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांची राज्यातील पडू याठिकाणी सिव्हिल पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.

वडील बाहुबली रोड्ड हे शेतकरी व शहरातील कर्नाटक विकास बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करीत आहेत. कु.शुभम याने आपणही सरकारी सेवेत रुजू व्हावे यासाठी पोलिस बनण्याचे स्वप्न पाहिले. त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल सुरू केली. शहरातील के.एस.पाटील या शाळेत प्राथमिक व विद्यासागर शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले .त्यानंतर निपाणी येथे बागेवाडी महाविद्यालयात बी.एस्सी पदवी पूर्ण केली. हे करीत असताना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळवून विविध ठिकाणी जाऊन मार्गदर्शन मिळवले . त्यानंतर कोरोणामुळे गेल्या दोन वर्षापासून घरीच राहून अध्ययन केले. गेल्या महिन्यात मुडबिद्री येथे पोलीस भरतीसाठी परीक्षा दिली.त्यानंतर कोडगु येथे शारीरिक परीक्षा ही दिली होते. या दोन्ही परीक्षेचा निकाल शनिवारी 29 रोजी लागली व या निकालात शुभम यांचे कोडगु येथे पोलिस दलात सिव्हिल पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.

थोडे नवीन जरा जुने